गहुहिवरा येथे राजमाता जिजा़ऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
नागपूर कन्हान : – गहुहिवरा युवक मित्र परिवार व्दारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमासह साजरी करण्यात आली.
दि.१२ जानेवारी ला सायंकाळी गहुहिवरा येथे मॉ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वामी विवेका नंद यांच्या प्रतिमेस जेष्ठ नागरिक शेषरावजी ठाकरे यांच्या अध्यक्षेत श्री जयकृष्ण (जयंत) निंबाळकर व निखिल पाटील यांच्या हसते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस पाटील दुर्योधनजी ठाकरे, प्रदीप निंबाळकर, गजानन महल्ले, वसंतराव मसार, कृष्णा नाखले, महेंद्र श्यामराव शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल निंबाळकर यांनी तर आभार स्वप्निल बोरकुटे यांनी मानले. यशस्वितेकरिता सुमित ठाक+रे, स्वप्नील बोरकुटे, हर्षल निंबाळकर, रोशन मसार, शेखर राऊत, प्रणव बोरकुटे, रोशन नाखले, राहुल लुहुरे, आकाश वैध, प्रमोद शेंडे, राहुल धांडे, निखिल धांडे, तुषार येरणे, निकील चव्हाण, मिलिंद चव्हाण आदीने सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535