राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी
Summary
कन्हान : – परिसरातील विविध सामाजिक स्थानिय संस्थे व्दारे विविध कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबीई फुले […]
कन्हान : – परिसरातील विविध सामाजिक स्थानिय संस्थे व्दारे विविध कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी करण्यात आली.
जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबीई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार, मार्ल्यापन करून महिलाच्या विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.
१२ जानेवारी २०२१ ला कोरोना च्या सावटात राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव घरोघरी साजरा करित जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले यांच्या अध्यक्षेत नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्व क्षेत्रात आज महिला अग्रेसर असल्या तरी सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी जोमाने पुढाकार घेतल्यास देशाला प्रगती पथावर नेण्यास कोणीही अडवु शकत नाही. तसेच खरी लोकशाही देशात नादु शकेल असे मनोगत जिजाऊ ब्रिगेड च्या छायाकाई नाईक हयांनी व्यकत केले. तदंनतर महिलांनी विविध कार्यक्रम करून जिजाऊ जन्मोत्सव थाटात साजरा केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुषमा बाते यानी तर आभार सुनिता ईखार हयानी व्यकत केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वितेकरिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या शिवमती मायाताई इंगोले, छाया ताई नाईक, सुनंदा दिवटे, कमलाताई गोतमारे, विद्या रहाटे, सिंधुताई खुरगे, सुषमा बांते, लताताई जळते, रंजना इंगोले, शितल बांते, मिनाक्षी भोयर, सुनिता ईखार, अनिता पाटील, पुनम राठी, खोब्रागडे ताई, किरण अनकर, अल्का कोल्हे, मनिषा धुडस, उज्वला लोखंडे, गि-हे ताई, पुष्पा चिखले, अनिता पांजुर्णे, उषाताई पोटभरे, पुष्पा बरलेवार, राजेश्वरी पिल्ले, नितु ओडियार, वाटकर ताई आदीने सहकार्य केले.
नगरपरिषद कन्हान-पिपरी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या सयुक्त जयंती निमित्य नगरपरिषद कन्हान पिपरी नगराघ्यक्षा करूणाता़ई आष्टणकर, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान, विवेकानंद, हिराबाई शाळा, शिवाजी नगर कन्हान परिसरात वृक्ष रोपन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका गुंफाताई तिडके, पुष्पाकाई कावडकर, रेखाताई टोहणे मनिषा चिखले, प्रदीप बावने सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था व्दारे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा
नागपूर कन्हान : – राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्य सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान व्दारे महामाया बुद्ध विहार इंदिरा नगर कन्हान येथे राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे ला पुज्य माताजी महाथेरी रूपानंदा यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी दुर्गाताई निकोसे यांनी मॉ साहेब जिजाऊ हयानी शिवराय एक आदर्श राजा घडविला. त्यांच्या साहसी जीवना विषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मायाताई चिमनकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षमय जिवनावर प्रबोधनात्मक गीत प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमिलाताई घोडेश्वार यानी तर आभार आम्रपाली वानखेडे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सावित्री बाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान च्या माया ताई बेलेकर, शारदा वारके, रत्नमाला वराडे, उषा सांगोडे, दुर्गा गजभिये, संध्या साखरे, ज्योती मोटघरे, वत्सला कळमकर, मायाताई वाघमारे, विजया निकोसे , अनिताताई चाहांदे, गजभिये ताई, बागडे ताई, करूणाताई डोंगरे आदीने सहकार्य केले.
मराठा सेवा संघ कन्हान
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त मराठा सेवा संघ कार्यालय तारसा रोड कन्हान येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस डॉ पं दे रा शि परिषद राज्य उपाध्यक्ष शिवश्री शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कॉग्रेस किसान कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काकडे, विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, राजुजी रेंघे पाटील, शिवशंकर वाकुडकर, योगराज अवसरे , दिपक तिवाडे, बाळासाहेब मेश्राम, सुरज करंडे, सुमित खैरकार, आयुष रेंघे आदीने सहकार्य केले. शिवशक्ती आखाडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची सयुक्त जयंती निमित्य शिवशक्ती आखाडा बोरी (सिंगारदिप) व्दारे सर्व प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस गावातील वरिष्ठ नागरिक रामचंद्र राऊळ यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर मुलांनी शस्त्र प्रात्यक्षिक सादर करून मुलांनी आज च्या दिवसाचं महत्वावर मनोगत व्यकत केले. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शिवशक्ती आखाडा प्रामुख पायल येरणे, निकिता येरणे, सुहानी येरणे, हितेश डाफ, तृप्ती येवले, अंजली येवले, निकिता राठोड, निधी नागपुरे, निशा भोले, हर्षल येरणे, हर्षल राऊळ आदीने सहकार्य केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535