त्या जप्त केलेल्या चार हजार 600 ब्रास वाळू साठ्याचा लिलाव जाहीर
जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दि.19/1/2021 रोजी दुपारी 12:00 वा उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली .
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापुर येथे अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन 2018-19 मध्ये संयुक्त वाळू ठेकेच्या लिलावामधील शिल्लक असलेल्या. सुमारे चार हजार 644.84 ब्रास वाळू साठा जप्त केला .असुन हा वाळू साठा सिद्धापुर येथे ठेवण्यात आला आहे..
या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 1 कोटी 71 लाख 85 हजार 908 रुपये इतकी आहे.ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यायचा आहे अशा व्यक्तिंने संबंधित ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी..
तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत . असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले..
सदर लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के रक्कम अथवा डीडी द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विना परतावा भरणे आवश्यक आहेत तसेच सर्वोत्तम बोलीचे 25% रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजान्यात चलनाद्वारे भरावी
बोलीचे उर्वरित 75 टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणी वाळू घेऊन जावी ..
लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी तसेच नमूद ठिकाणी वेळेवर उपस्थित असे आव्हान उपविभागीय अधिकारी श्री भोसले यांनी केले आहे
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क