BREAKING NEWS:
महाराष्ट्र

तासगाव तालुक्यातील शहीद जवानाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार तासगाव तालुक्यातसह बेंद्री गाव हळहळले

Summary

राजू थोरात तासगांव /प्रतिनिधी तासगाव तालुक्यातील बेंद्री गांवचे सचिन जाधव हे जवान आंध्रप्रदेश मध्ये चित्तूर येथे सेवा बजावत होते, त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी जाधव आहे. शिवाजी जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सचिनला शिकवले. खडतर प्रवास करीत सचिनचे प्राथमिक शिक्षण बेद्रीं […]

राजू थोरात तासगांव /प्रतिनिधी

तासगाव तालुक्यातील बेंद्री गांवचे सचिन जाधव हे जवान आंध्रप्रदेश मध्ये चित्तूर येथे सेवा बजावत होते, त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजी जाधव आहे. शिवाजी जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सचिनला शिकवले. खडतर प्रवास करीत सचिनचे प्राथमिक शिक्षण बेद्रीं या गावी झाले. बारावीनंतर पुढील शिक्षण तासगावमध्ये घेतले होते बारावीनंतर अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत देशसेवेसाठी 2010मध्ये ते भरती झाले होते पुढे त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती आंध्र प्रदेश चित्तूर येथे आयटीबीपी 53 बटालियन येथे कार्यरत होते.
जवान सचिन जाधव हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते बेंद्री सह तासगाव शहरात प्रत्येकाशी अत्यंत चांगले व जिव्हाळ्याचे संबंध होते सामाजिक कार्यात नेते सक्रिय होते.
लॉकडाउनच्या काळात काही दिवस ते बेंद्री गावीच होते.
सहा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते त्यांना तीन वर्षांचा मुलगा तर मागील महिन्यापूर्वी कन्यारत्न झाले होते या कन्येचा नामकरण विधी साठी ते आपले कर्तव्य बजावून आंध्रप्रदेश मधून गावी येण्यासाठी निघाले असताना त्यांचे अपघाती निधन झाले. आपल्या कन्येचा नामकरण सोहळा जोरदार करायचा असा चंग त्यांनी बांधला होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. छोट्या छकुलीला पाहण्या अगोदरच त्यांचे दुर्दैव्य निधन झाले
दी 11 रोजी त्यांचे पार्थिव बेद्रीं या गावात आल्यानंतर आई वडील व त्यांच्या पत्नीचा हंबरडा ऐकुन सर्व उपस्तिथांचे डोळ्यातुन अश्रु दिसत होते.
पार्थीव गावात आल्यानंतर बेंद्री गाव व शिवाजीनगर येथील नागरिकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतुन अंत्ययात्रा काढली.
सचिन जाधव यांचे पार्थिव तिरंगा ध्वजामध्ये होते.त्या नंतर आयटी बीपी 53 बटालियन चितूर यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली सब इन्स्पेक्टर ए एस आई जी डी प्रशांत ईके,
हवालदार जी डी वालवेदत्ता
हवालदार जी डी कबीरदास
शिपाई जी डी व्यंकट
शिपाई जी डी एन रामचंद्र
शिपाई जी डी फ्रान्सिस पी
शिपाई जी डी कृष्णा
सांगली मुख्यालय पोलीसदल व
तासगाव पोलीसदल यांच्या वतीने मानवंदना देण्यांत आली.दी 11 रोजी पूर्वसंध्येला त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सचिन जाधव यांच्या जाण्याने बेंद्री गावातच तासगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *