BREAKING NEWS:
महाराष्ट्र

डिफेन्स फॅक्टरी मध्ये स्फोट : 1 जखमी

Summary

चंद्रपूर : भद्रावती : भद्रावती येथील आयुध निर्माणीत दारुगोळ्याचा टाकाऊ स्फोटक माल निकामी करीत असताना त्या स्फोटकांचा अचानक भडका झाल्याने कर्तव्यावर असलेला एक कामगार जखमी झाल्याची घटना आज, सोमवारला सकाळी 9 वाजून 30 मिनिटाचा सुमारास युनिट क्रमांक 3 जवळील बर्निंग […]

चंद्रपूर : भद्रावती : भद्रावती येथील आयुध निर्माणीत दारुगोळ्याचा टाकाऊ स्फोटक माल निकामी करीत असताना त्या स्फोटकांचा अचानक भडका झाल्याने कर्तव्यावर असलेला एक कामगार जखमी झाल्याची घटना आज, सोमवारला सकाळी 9 वाजून 30 मिनिटाचा सुमारास युनिट क्रमांक 3 जवळील बर्निंग ग्राऊंडवर घडली.

निर्माणीतील युनिट 9 मधील कार्यरत लक्ष्मीकांत गजानन आक्केवार (राहणार किल्ला वार्ड भद्रावती) असे जखमी कामगाराचे नाव असून, तो आज दिनांक 11 जानेवारी ला आपला युनिट 9 मधील दारुगोळ्याचा टाकाऊ माल नष्ट करण्याचे काम पार पाडीत असताना तेथील टाकाऊ स्फोटकाने अचानक भडका घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.

त्यात त्याच्या शरीराला गंभीर इजा पोहोचल्याने त्यांना सर्वप्रथम आयुध निर्माणीच्या रुग्णालयात नेण्यात आले . नंतरच्या उपचारासाठी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्तलिहीपर्यंत याबाबतची अधिकची माहिती निर्माणी प्रशासनाकडून जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *