BREAKING NEWS:
महाराष्ट्र

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मोडाळेत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी – छगन भुजबळ

Summary

नाशिक, इगतपुरी, दि.११ जानेवारी :- कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक विकास कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र आता लवकरच सर्व सुरळीत होऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व […]

नाशिक, इगतपुरी, दि.११ जानेवारी :- कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक विकास कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र आता लवकरच सर्व सुरळीत होऊन प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर,माजी आमदार शिवराम झोले, जयवंतराव जाधव, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शितल सांगळे, इपंथी फाउंडेशनचे अध्यक्ष सुदंरेश्वरम, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, धनंजय बेळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, निवृत्ती जाधव, संदीप गुळवे, सरपंच पांडुरंग खातोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कुठल्याही भागाचा विकास करतांना सर्वांनी पक्षभेद सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. त्यातून चांगल्या प्रकारचा विकास साध्य होऊ शकतो. विकास कामांसाठी शासनाचा सर्वात मोठा वाटा असतो मात्र सर्वच प्रकारचे कामे शासन एकटे करू शकत नाही. शासन अनेक अडचणींचा सामना करत असताना सामाजिक संस्था आणि उद्योजकांनी पुढे येऊन राज्यातील विकासासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन साजरा केला जात असून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मुलींनी शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. कुणीही अर्ध्यावर शिक्षण सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केली. तसेच इपंथी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो शाळांची निर्मिती केली आहे. त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच याप्रकराची सर्व विकासकामे करण्यामागे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केलेला पाठपुरावा हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मोडाळे या गावात आज विविध विकासकामे मार्गी लागत आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून विकास निधी आणण्यात आला असून लवकरच या कामांना सुरुवात होईल असे सांगितले.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज इगतपुरी तालुक्यातील मोडाळे जिल्हापरिषद शाळा सामाजिक सभागृह, डिजिटल अंगणवाडी इमारत, व्यायामशाळा इमारत, वाटर एटीएम मशीन चे लोकार्पण करण्यात आले तर अभ्यासिका, ग्रीन जिम, मोडाळे ते भवानी माता मंदिर पेव्हर ब्लॉक रस्ता,मोडाळे ते ढोन्नर वस्ती रस्ता, ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मोडाळे नवीन इमारतीचे भूमिपूजन पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *