राशन कार्ड धारकांसाठी आवश्यक सूचना
रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्यांना आता आधार क्रमांक लिंक करणं बंधनकारक करण्यात आलंय. जर रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक केला नाही तर 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद करण्यात येणारे. शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्य घेणाऱ्यांना आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्नयोजनेतील रेशनकार्डातील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर तसंच आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि अंत्योदय अन्नयोजनेत एकूण 13,32,871 लाभार्थी आहेत. यापैकी सुमारे तीन लाख पेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंक झालेलं नाही.
नवी मुंबई न्युज रिपोर्टर
प्रशांत मानसिंग जाधव