BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जे. एम. पटेल महाविद्यालय भंडाराच्या माजी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थांकडून पुरपिडितन्ना आर्थिक मदद

Summary

प्रज्वल राउत/भंडारा जिल्हा             सूमारे एक आठवड्यापूर्वी वैनगंगा आणि सुर नदी ला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भंडारा जील्हातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. मागील पंच्चविस वर्षता असा पुर बघितला नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा वसियांतर्फे व्यक्त होत आहे. नजरे […]


प्रज्वल राउत/भंडारा जिल्हा
             सूमारे एक आठवड्यापूर्वी वैनगंगा आणि सुर नदी ला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भंडारा जील्हातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. मागील पंच्चविस वर्षता असा पुर बघितला नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा वसियांतर्फे व्यक्त होत आहे. नजरे समोर आपले  पाळीव गुरढोर व घरातिल सामान पान्याच्या प्रवाहात वाहुन जाताना पाहुन गोर गरीब जनतेचे हृदय पिळवटून निघाले. अशा संकटाच्या वेळी प्रशासनाच्या सोबत बऱ्याच समाजसेवी संघटना व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. ह्या पैकीच्या विशेष उल्लेख करता येईल अशे म्हणजे भंडारा येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माझी सेवा स्वयंसेवकांकडून पुरपीडितांना  करण्यात आलेल्या आर्थिक मदत. ह्या विद्यालयाचे माजी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनाभंडारा जिल्हा माजी समन्वयक डॉ. राजेन्द्र शाह आणि सत्र २०१८-१९ मधिल त्यांचे माजी रासेयो विद्यार्थी जीतसिंह लिल्हारे, अतुल गेडाम, अंकित टिचकुले, पवन शेंडे, अनिल आंबेकर, आधार निर्वाण, वैष्णवी क्षीरसागर, स्नेहा बोंद्रे, प्रज्वल निंबार्ते. इत्यादिन्नी जवळून निधी संकलन करून जे. एम. पटेल महाविद्यालयातील अत्यंत गरजू व पुरपिडित रासेयो विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पंचविस हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ह्या मध्ये वरठी रोड दाभा निवासी प्रगती गोंडाने, भोजापुर निवासी ऋषिका मोहुर्ले, करचखेडा निवासी अखिल हजारे, पिंडकेपार निवासी वैष्णवी खंगारे, संत कबीर वार्ड निवासी दिक्षिता तरारे, रोशन बारपत्रे, दामिनी तारारे, अविनाश दिरबुडे, रिया वासनिक, सागर ठाकरे आणि दुर्गा राउत ह्या पुरग्रस्त रासेयो कुटंबियान्ना त्यांच्या घरी  जाऊन आर्थिक सहकार्य केले. डॉ. राजेन्द्र शाह आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबियांना भेटून ह्या नैसर्गिक आपत्तीमुळेझालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांची विचारपुस केली.  त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगून सांत्वन केली. प्रत्यक्ष आपले शिक्षक विपत्तीत आपल्या घरापर्यंत मदत करायला आलेले बघून विद्यार्थ्यांना आनंद व आश्चर्य झाला आणि शिक्षक दिवस सार्थक झाला असे त्यांना वाटले. भावी आयुष्यात आम्हीपण अशा विपत्तीमध्ये दुसऱ्यांना मदत करू असा निर्धार शाह व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, शासकीय अधिकारी डॉ. कार्तिक पनिकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *