*ये-जा करण्याकरिता ५ फिटाचा रस्ता मोकळा करण्याची मागणी* #) प्रभाग क्र.१ च्या नागरिकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन.
नागपूर कन्हान : – नगरपरिषद च्या प्रभाग क्रमांक १ च्या आंबेडकर नगर सात नंबर नाका येथील संजय गायक वाड हे घर बांधत असल्याने बाजुच्या गल्ली मधुन येणार्या – जाणार्याचा रस्ता बंद करण्याचा दिशेने बेताब दिसुन येत असल्याने येथील नागरिकांनी जिल्हाधिका री यांची भेट घेत या विषयावर चर्चा करुन ये-जा कर ण्याकरिता कमीत कमी पाच फिटाचा रस्ता मोकळा करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.
संजय गायकवाड या व्यक्तीने नगरपरिषद कन्हान -पिपरी ची परवानगी न घेता घराचे बांधकाम करीत असतांना प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांनी दि. ९/१२ /२०२० ला नगरपरिषद प्रशासनाला अर्जा व्दारे तक्रार केली असुन नप प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार वाई न केल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या व्यक्तीच्या घराचे बांधकाम सुरु आहे त्यांच्या आजु-बाजुच्या घर मालकांना नगरपरिषद प्रशा सनाने नोटीस देऊन त्यांच्या जागेची रजिस्ट्री नगरपरि षदेला जमा करण्यास सांगुन जागेचे मोजमाप नगरप रिषद करणार होती.परंतु दि.२३/१२/२०२० ला नगर परिषदेचे शासकीय अधिकारी, कर्मचारी व नप नगरा ध्यक्षा घर बांधकाम करते वेळी न येता सायंकाळी ६ वाजता दरम्यान येऊन कोणत्याही प्रकारचे मोजमाप, चौकशी न करता संजय गायकवाड यांचा पक्ष घेऊन चर्चा करून बांधकाम करण्यास तोंडी परवानगी देण्या चा प्रयत्न केला. या प्लाट धारकाने एक फिटचे अतिक्र मण केले असल्याने त्या वेळच्या ग्राम पंचायतने ते अवै धरित्या बांधलेले बांधकाम तोडण्याचा आदेश सुद्धा दिला होता. याच जागेवर संजय गायकवाड घराचे बां धकाम करीत आहे. येथे लोकांना येण्या-जाण्याकरिता तो एकच मार्ग असुन हा पाच फिटचा रस्ता ५० वर्षा पासुन वापरत असुन दुसरा रस्ता नाही. यामुळे प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करून निवेदन देऊन पाच फिटचा रस्ता मोकळा करण्याची मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता संजय रंगारी, अविनाश नागदेवे, शालु दिलीप बेलेकर, नितु वसंता अनकर, परिनिता अनकर, मुक्ताबाई अनकर, दिपा बगडते, वच्छला बगडते, बेबीबाई बगडते, सचिन बगडते, पौर्णिमा नंदेश्वर, बेबीबाई वासनिक, कविता वासनिक, प्रतिक विश्वकर्मा सह नागरिक उपस्थित राहुन कमीत कमी पाच फिटाचा रस्त्या मोकळा करण्याची मागणी केली आहे.