घोडेझरी शिवारात अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; युवकाकडून ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पालांदुर (भंडारा):
जिल्ह्यातील वाढत्या अवैध रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी भंडारा पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया सुरू असून, पालांदुर पोलीस ठाण्याने आणखी एक मोठी कारवाई करत रेतीमाफियांना चपराक दिली आहे.
दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते ९.२० वाजेदरम्यान, मौजा घोडेझरी शिवार (१० किमी उत्तर) येथे शासनाच्या मालकीची रेती (गौण खनिज) विनापरवाना वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पो.हवा. संजय तेजराम दोनोडे (ब.नं. ७३५) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
आरोपी व त्याचा अवैध धंदा उघडकीस
पोलिसांच्या मते, पकडलेला आरोपी
रोहित रतन देउळकर (वय २२ वर्ष, जात – वाढई, रा. पहाडी, पालांदुर, ता. लाखनी)
हा स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे परवान्याविना रेतीची चोरटी वाहतूक करत असल्याची खात्री पटली.
जप्त मुद्देमाल
कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल ताब्यात घेतला:
स्वराज 843 ग्ड कंपनीचा शेंदरी रंगाचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर
इंजिन क्रमांक: थ्ठत्श्रथ्10539
चेसीस क्रमांक: ऍटज्थ्76619116416
किंमत: ७,००,००० रुपये
लाल रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली
किंमत: ट्रॅक्टरमध्ये समाविष्ट
ट्रॉलीतील अंदाजे १ ब्रास रेती
अंदाजे किंमत: ६,००० रुपये
एकूण जप्त मुद्देमाल: ७,०६,००० रुपये
गुन्हा दाखल
फिर्यादीच्या लिखित तक्रारीवरून पालांदुर पोलीस ठाण्यात
अप. क्र. ०९/२०२६
कलम ३०३(२), भा.न्या.संहिता २०२३
अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पो.हवा. झलके (ब.नं. १३६९) हे करीत आहेत.
जिल्हा पोलिसांचा अवैध रेती माफियांवर सततचा दबाव
या सातत्यपूर्ण कारवाया पाहता स्पष्ट होते की भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन अवैध रेती उत्खननाला कुठलीही सवलत देण्याच्या मनःस्थितीत नाही. या प्रकरणामुळे परिसरातील रेतीमाफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
