कोंढाळी नगराध्यक्ष एक्शन मोडवर क्लिन कोंढाळी! ग्रीन कोंढाळी!!
कोंढाळी – प्रतिनिधी
स्वच्छ व सुंदर नगर घडविण्याचा निर्धार
कोंढाळी | प्रतिनिधी
नवगठित कोंढाळी नगरपंचायतीला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नगर बनविण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असून नगराध्यक्ष योगेश चाफले हे पूर्णतः एक्शन मोडवर आले आहेत. क्लिन कोंढाळी, ग्रीन कोंढाळी या संकल्पनेतून संपूर्ण नगर स्वच्छ ठेवण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आठवडी बाजार, दैनिक बाजार, नागरी भागातील मुख्य रस्ते तसेच उपरस्ते स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठी सफाई व स्वच्छता निरीक्षकांसह सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच नगर स्वच्छ ठेवण्यासाठी कोंढाळीतील सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आग्रही आवाहन नगराध्यक्ष योगेश चाफले यांनी केले आहे.
या वेळी त्यांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे विशेष आभार मानत सांगितले की, नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतानाच आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रयत्नातून कोंढाळी नगरपंचायतीसाठी पाच स्वच्छता वाहने व एक ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले. सदर वाहने क्लिन कोंढाळी अभियानासाठी प्रभावीपणे वापरण्यात येत असून त्यामुळे स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे.
स्वच्छ कोंढाळी, सुंदर कोंढाळी घडविण्यासाठी सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी आपापल्या प्रभागात प्रभात स्वच्छतेवर भर देत, सफाई कामगारांच्या सहकार्याने नगर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
यासोबतच ग्रीन कोंढाळी या संकल्पनेअंतर्गत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणावर भर देत कोंढाळीला ग्रीन सिटी बनविण्याचा पुढचा टप्पा लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.सोबतच नगराध्यक्ष योगेश चाफले यांनी सांगिले की कोंढाळी नगर पंचायत नव्याने गठित करण्यात आली आहे.याकरिता आता प्राथमिक सेवा म्हणून पाणी पुरवठा -स्वच्छता-रस्ते दुरुस्ती -प्रकाश व्यवस्था,-आरोग्य सेवा -कचरा व्यवस्थापन -शिक्षण नियोजन -अधिकारी व कर्मचारी व्यवस्थान यावर लक्ष केंद्रित करून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी आपले पालकत्व स्विकारलेलेआमदार चरणसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे , खासदार श्याम कुमार बर्वे ,नगर विकास विभाग यांचे कडून वेळो वेळी विकास निधी साठी प्रयत्न ही पहिली प्राथमिकता असेल अर्थातच या साठी नगर पंचायत उपाध्यक्ष हेमलता ताई पालीवाल सर्व नगरसेवक नामनिर्देशित नगरसेवक यांचे सहकार्य ही महत्त्वाचे असेल.
एकूणच नवगठित कोंढाळी नगरपंचायतीला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक नगर बनविण्यासाठी आवश्यक ती महत्त्वाची पावले उचलत नगराध्यक्ष योगेश चाफले हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

