एकलारी येथे राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
Summary
एकलारी | प्रतिनिधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकलारी येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून तसेच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये थोर महापुरुषांच्या विचारांचा […]
एकलारी | प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, एकलारी येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून तसेच स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या संयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून केली. उपस्थित सर्वांनी या महान विभूतींना अभिवादन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक शिक्षक पुष्पकुमार उके यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वामी विवेकानंदांची प्रखर बुद्धिमत्ता आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार व धाडस आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक आहेत. या विचारांचे आत्मसात करून जीवनात यशस्वी वाटचाल करावी.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीता शेंद्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका सौ. ममता खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक वंदे मातरम् गायनाने करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. वंदना शहारे, सौ. कविता चव्हाण, सौ. ज्योती हटवार, सौ. अस्मिता भोयर, प्रशांत बालपांडे, शिवाजीराव ग्राम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील भोयर, सचिव अनिल आमटे तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
