महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

Summary

मुंबई, दि. १ : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे […]

मुंबई, दि. १ : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. संबंधित भरतीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवारांना वेबलिंकपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्याने मुदत वाढ देण्यात आली आहे.

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी खालील Web Link किंवा QR Code चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अर्जासाठीची लिंक:

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html

 

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *