राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे ओझर विमानतळ येथे आगमन व स्वागत
नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र व गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी तसेच प्रशासानाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक मंडळचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत चतुर्वेदी, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (कळवण) कश्मिरा संखे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) कुंदन हिरे आदी उपस्थित होते.
