क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

नवीन बसस्थानक परिसरात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल चोरीला तुमसर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Summary

तुमसर | प्रतिनिधी — शहरातील नवीन बसस्थानक परिसरात खरेदीसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देबेलाल लक्ष्मण […]

तुमसर | प्रतिनिधी — शहरातील नवीन बसस्थानक परिसरात खरेदीसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देबेलाल लक्ष्मण टेंभरे (वय 70 वर्षे, रा. विनोबा नगर, तुमसर) हे दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.00 वाजताच्या सुमारास घरून किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी नवीन बसस्टॉप परिसरात असलेल्या दुकानात गेले होते. खरेदी करून घरी परतल्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल फोन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीस गेलेला मोबाईल हा कीपॅड मोबाईल (मॉडेल: D35 5G) असून त्याची अंदाजे किंमत 5,100 रुपये आहे. सदर मोबाईलचा IMEI क्रमांक 350967551480854 असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या खिशातून मोबाईल काढून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून तसेच सिटिझन पोर्टल अ‍ॅपवरील तक्रार क्रमांक 19376016072500232 च्या आधारे, पोलीस निरीक्षकांच्या तोंडी आदेशान्वये पोलीस स्टेशन तुमसर येथे अपराध क्रमांक 825/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. राकेश कुहीटे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *