सिहोरा पोलीस स्टेशन चार वाहनांवर दंडात्मक कारवाई
Summary
सिहोरा पोलीस स्टेशन न्यूज वार्ता:-तुमसर तहसील मधील सिहोरा पोलीस स्टेशन मध्ये नव नवीन आलेले थानेदार नारायण तुरकुंडे साहेबांनी पुष्कळ दिवसांपासून शासकीय आधारभुत असलेल्या तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन वाहने ताब्यात घेतले.ह्या सिहोरा पोलीस स्टेशन […]
सिहोरा पोलीस स्टेशन न्यूज वार्ता:-तुमसर तहसील मधील सिहोरा पोलीस स्टेशन मध्ये नव नवीन आलेले थानेदार नारायण तुरकुंडे साहेबांनी पुष्कळ दिवसांपासून शासकीय आधारभुत असलेल्या तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन वाहने ताब्यात घेतले.ह्या सिहोरा पोलीस स्टेशन च्या धाडसी कार्यवाही मुळे धान व्यापारी वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र राज्यातील धान खरेदी केंद्रावर भाव मध्यप्रदेशापेक्षा दर जास्त आहेत व बोनस सुध्दा ७००रु.प्रतेकी क्विंटल आहे.ह्याआसेने मध्यप्रदेश शेतकऱ्यांचे धान गैरमार्गाने खरेदी करुन महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या ७/१२ वर काहि महाराष्ट्रातील व्यापारी व मध्यप्रदेशातील व्यापारी हा गोरखधंदा धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून करत होते.व व्यापारी मालामाल बनत होते.आणी महाराष्ट्रातील बिचारे शेतकरी काटा कैव्हा होतोय याच्या प्रतिक्षेत असतात.शासनाने प्रत्येक धान खरेदी केंद्रावर लक्ष देण्याची गरज आहे.
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”चे स्पेशल न्यूज रिपोर्टर”राजेश उके” सिहोरा पोलीस स्टेशन ला गेले असतांना तिथले थानेदार नारायण तुरकुंडे यांच्या सोबत भेट घेतली व त्यांनी सांगितले की वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक वंसत जाधव साहेब अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष सिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातील येणाऱ्या वाहन क्र.एम.पी.५०जी.०९९५,एम.पी.५०जी.१०८५,एम.पी.५०जी१७०७ व एम.पी.५०जी२०२१अशा अनुक्रमे वाहणार कार्यवाही करत भा.द.वि. कलम ४२०अपराध क्रमांक. २१५/२०२० गुन्हा नोंद करण्यात आला.