रोजंदारी मजदूर सेनेच्या लढ्याला यश; चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सहा कंत्राटी कामगारांना पुन्हा रोजगार
Summary
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राट संपल्याच्या कारणावरून अचानक कामावरून कमी करण्यात आलेल्या सहा कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे त्यांना पुन्हा रोजगार प्राप्त झाला आहे. या यशामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चंद्रपूर […]
चंद्रपूर :
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राट संपल्याच्या कारणावरून अचानक कामावरून कमी करण्यात आलेल्या सहा कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे त्यांना पुन्हा रोजगार प्राप्त झाला आहे. या यशामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील डब्ल्यू.टी.पी. 210 मेगावॅट विभागात एम.एस. बी.एम. काळे या अस्थापनेच्या “AMC for Gear Box & Auxiliary Maintenance of Cooling Tower Fan” या कंत्राटांतर्गत गेल्या 8 ते 9 वर्षांपासून कार्यरत असलेले
निखिल मनोहर किन्नाके
प्रकाश पुंडलिक आसुटकर
पांडुरंग गणपत गोने
प्रविण मधुकर हुळे
कपिल केशव सुखदेवे
पवन प्रविण मानकर
या सहा कंत्राटी कामगारांना दिनांक 8 मे 2025 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंत्राट संपल्याचे कारण सांगून कामावरून कमी करण्यात आले होते.
नवीन टेंडर निघेल या आशेवर या कामगारांनी तब्बल सात महिने प्रतीक्षा केली; मात्र कंत्राट न निघाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. हे सहाही कामगार आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.
अखेर दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी या कामगारांनी भाई सदानंद पुंडलिक देवगडे, विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना (संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह), चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर संघटनेने तात्काळ चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाकडे प्रकरण नोंदवून सातत्याने पाठपुरावा केला.
संघटनेच्या दबावामुळे प्रशासनाला अखेर नवीन कंत्राटाची ऑर्डर काढावी लागली आणि दिनांक 19 डिसेंबर 2025 पासून या सहा कामगारांना त्यांच्या पूर्ववत कामावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले. त्यामुळे त्यांना रोजगारासह न्यायही मिळाला.
या आनंदाच्या क्षणी महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या मेजर गेटसमोर कामगारांनी पुष्पगुच्छ देऊन भाई सदानंद पुंडलिक देवगडे, तसेच भाई सुभाषसिंग बावरे (केंद्रीय प्रभारी), भाई विवेकानंद मेश्राम (शाखा अध्यक्ष), भाई दिवाकर डबले (जिल्हा संघटक), भाई दीपक बेलगे (जिल्हा उपाध्यक्ष), भाई डोमेश्वर धपाडे (जिल्हा सचिव), भाई सुरज शेंडे (शाखा सहसचिव), भाई सागर किन्नाके (जिल्हा कार्याध्यक्ष), भाई प्रबुद्ध डांगे (शाखा कार्याध्यक्ष), भाई देवचंद गणवीर (शाखा कोषाध्यक्ष) यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी कामगारांनी भविष्यात संघटनेशी एकनिष्ठ राहून संघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“रोजंदारी मजदूर सेनेचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
