लाखांदूरमध्ये सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला भव्य धम्म संमेलन; संत-भिक्खूंची उपस्थिती, धम्म रॅली आणि संगीतमय प्रबोधनाने होणार जागर
Summary
लाखांदूर (भंडारा): बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती, लाखांदूर तालुक्याच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर 2025 रोजी भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून धम्म रॅलीला प्रारंभ होणार असून हजारो […]
लाखांदूर (भंडारा): बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती, लाखांदूर तालुक्याच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर 2025 रोजी भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून धम्म रॅलीला प्रारंभ होणार असून हजारो बौद्ध अनुयायी, भिक्खू संघ व विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.
प्रियदर्शी सम्राट अशोक परिसरात मुख्य कार्यक्रम
धम्म संमेलनाचा मुख्य कार्यक्रम प्रियदर्शी सम्राट अशोक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, पिंपळगाव रोड, लाखांदूर येथे पार पडणार आहे. संपूर्ण परिसर सज्ज असून उपस्थितांसाठी विस्तृत व्यवस्थाही करण्यात आली आहे.
बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील भिक्खूंची प्रमुख उपस्थिती
धम्म रॅली आणि संमेलनाला बोधगया येथील नामवंत भिक्खूंची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. यात
भदंत विनाचार्य
लोब सांग तेनपा
भंते चित्तज्योती स्थवीर
भदंत महामोग्गलायन थेरोसावंगी
भंते शीलभद्र चीचाळ
भदंत चारुदत्त ओपारा
भदंत कुणाल कीर्ती
यांचा समावेश आहे.
त्यांच्या नेतृत्वात धम्म प्रचार, मैत्री संदेश आणि धम्म रॅली पार पडणार आहे.
उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांची गौरवशाली उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अशोक वानखेडे, वरिष्ठ पत्रकार, दिल्ली यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुषमाताई अंधारे, सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, मुंबई भूषवणार आहेत.
स्वागताध्यक्ष म्हणून अमन कांबळे, संपादक – आवाज इंडिया, नागपूर तर
मुख्य मार्गदर्शक म्हणून शेख सुभान अली, शिवचरित्र अभ्यासक, संभाजीनगर उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी:
अँड. शैलेश नारनवरे (कायदे सल्लागार, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, नागपूर)
अँड. स्मिताताई कांबळे, नागपूर
संध्याकाळी संगीतमय प्रबोधन — फैजानभाई ताज यांचा कार्यक्रम
सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध भीम कव्वाल फैजानभाई ताज, नागपूर यांचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रम होणार असून मोठ्या प्रमाणावर श्रोते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
धम्म संमेलनाचे दुसरे सत्र: सामाजिक प्रबोधन
धम्म, सामाजिक समता, संविधान मूल्ये, आंबेडकरी विचारधारा यावर मान्यवरांचे भाषण होणार आहे, ज्यात युवा पिढीच्या सहभागाला विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष भाग
ध्वजारोहण व धम्मदेशना
भव्य धम्म रॅली
सामाजिक प्रबोधन
संगीतमय प्रबोधन
उद्घाटन व अध्यक्षस्थान
उद्घाटन: दिनेश वासनिक, उद्योजक, लाखांदूर
अध्यक्षस्थान: डॉ. दिवेश कांबळे, प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी
उपाध्यक्ष व अतिथी
अनिल दहिवले (उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनी मोरगाव)
परमानंद मेश्राम (सामाजिक कार्यकर्ता, भंडारा)
आयोजन समिती
कार्यक्रमाचे लाभ आवाहन आणि नियोजन मनोज बनसोड, अध्यक्ष – आयोजन समिती यांनी केले आहे. संपूर्ण समिती, कार्यकर्ते आणि बौद्ध समाजाने उत्साहात तयारी केली आहे.
—
संकलन:- श्री गणेश सोनपिंपळे, वरिष्ठ पत्रकार, भंडारा-गोंदिया जिल्हा
