मोहाडी — रात्रीचा अंधार, चारगावचा रस्ता आणि 35.60 लाखांचे उघड झालेले रहस्य
Summary
मोहाडी:- रात्रीचे साधारण ८:३०. मौजा चारगावच्या रस्त्यावर तहसीलदार तुमसर यांचे पथक गस्तीवर होते. धुकं, शांत रस्ता… आणि अचानक समोर दिसलेला एक जडवाहनांचा प्रकाशझोत. त्या टिपरची नंबर प्लेट — डभ्-40-क्ब्-1845 टिपर लगेच थांबवण्यात आला. अधिकाऱ्यांनी जेव्हा कागदपत्रे तपासायला सुरुवात केली, तेव्हा […]
मोहाडी:- रात्रीचे साधारण ८:३०. मौजा चारगावच्या रस्त्यावर तहसीलदार तुमसर यांचे पथक गस्तीवर होते. धुकं, शांत रस्ता… आणि अचानक समोर दिसलेला एक जडवाहनांचा प्रकाशझोत.
त्या टिपरची नंबर प्लेट — डभ्-40-क्ब्-1845
टिपर लगेच थांबवण्यात आला.
अधिकाऱ्यांनी जेव्हा कागदपत्रे तपासायला सुरुवात केली, तेव्हा एक मोठा ‘ट्विस्ट’ समोर आला — रेती वाहतुकीचा परवाना संपलेला! पण ट्रकमध्ये काय?
संपूर्ण 10 ब्रास रेती — अंदाजे 60,000 रुपये किमतीची.
पथकाने तपास सुरू केला आणि लक्षात आले की ट्रक स्वतःच 35 लाखांचे जड आर्थिक मूल्य असलेले वाहन – म्हणजेच एकूण 35,60,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररीत्या चालवला जात होता.
संपूर्ण कारवाई महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाली आणि आरोपी चालक–मालक नेहाल बालगोपाल दुरुगकर (वय 33, रा. शहापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
—
नोंदवलेला गुन्हा: अप.क्र. 299/2025
कायदे: कलम 303(2) BNS सह 48(7), 48(8) महसुल अधिनियम
तपास अधिकारी: पोहवा दुर्योधन भुरे
मो. 9403355351
—
संकलन :- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
