महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

Summary

मुंबई, दि. २०: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावी, याकरिता १९ ते २३ […]

मुंबई, दि. २०: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. या नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावी, याकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन २३ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान खुले असणार आहे. प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित नियंत्रण कक्ष, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय, न्याय वैद्यक व विष शास्त्र विभाग, अभियोग संचालनालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, मध्यवर्ती कारागृह यांचे स्टॉल्स आहेत. प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे नाट्य रूपांतर पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.

या प्रदर्शनाला सर्व नागरिकांनी भेट द्यावी. विशेषतः विधि शाखेचे विद्यार्थी, वकील यांनी भेट देत नवीन कायद्याविषयी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंग यांनी केले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *