BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी नगर पंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सिटी सर्व्हेची गरज — स्वप्निल व्यास यांची मागणी

Summary

कोंढाळी, ता. नागपूर – कोंढाळी नगर पंचायतीच्या पायाभूत आणि नागरी विकासासाठी सिटी सर्व्हे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक युवा कार्यकर्ता स्वप्निल व्यास यांनी व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळीला ग्रामपंचायतीचा दर्जा असताना काही भागांचे सर्वेक्षण झाले होते. मात्र, पूर्ण […]

कोंढाळी, ता. नागपूर – कोंढाळी नगर पंचायतीच्या पायाभूत आणि नागरी विकासासाठी सिटी सर्व्हे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक युवा कार्यकर्ता स्वप्निल व्यास यांनी व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळीला ग्रामपंचायतीचा दर्जा असताना काही भागांचे सर्वेक्षण झाले होते. मात्र, पूर्ण गावाचा सिटी सर्व्हे अद्यापही झालेला नाही. मागील दोन वर्षांपूर्वी कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतरही शहर नकाशा तयार करण्यात आलेला नसल्याने नियोजनबद्ध विकासाला अडथळा येत आहे.

स्वप्निल व्यास यांनी सांगितले की, “नगर पंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी शहराचा सविस्तर सिटी सर्व्हे आवश्यक आहे. रस्ते, नाल्या, भूमिगत वीजवाहिन्या, मालमत्ता नकाशे, तसेच शासकीय आणि खाजगी जागांच्या मर्यादा निश्चित करण्यासाठी हा सर्व्हे अत्यंत महत्त्वाचा ठरेल.”

सिटी सर्व्हेच्या माध्यमातून तयार होणारे स्थलाकृतिक नकाशे, रस्ते नकाशे, मालमत्ता नकाशे, आणि भूमिगत रचना नकाशे हे भविष्यातील विकास आराखड्यासाठी आधारभूत ठरतात. या प्रक्रियेत GPS, थियोडोलाइट, स्कॅनर आणि इतर आधुनिक उपकरणांचा वापर करून अचूक मोजमाप केले जाते.

शहर सर्वेक्षणाचे दोन मुख्य उद्देश असतात —
१. शहराचे चित्रमय व अचूक प्रतिनिधित्व मिळवणे
२. अधिकाऱ्यांना विकास आराखडा तयार करण्यास मदत करणे

यामुळे नगर पंचायतीला पुढील विकासासाठी स्पष्ट दिशादर्शन मिळते, तसेच अतिक्रमण हटविणे, भूखंड नियोजन, रस्ते व नाल्यांची कामे, तसेच मालमत्ता कर आकारणी यांसारख्या कामांमध्ये पारदर्शकता येऊ शकते.

स्वप्निल व्यास यांच्या म्हणण्यानुसार, “नगर पंचायत हद्दीतील रस्ते, दुभाजक बांधकाम, भूमिगत नाले आणि वीजवाहिन्यांची उभारणी यांसाठी अधिकृत नकाशा आवश्यक आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सिटी सर्व्हे तातडीने हाती घेण्यात यावा.”

त्यांनी पुढे सांगितले की, “सिटी सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नगर पंचायतीला भविष्यातील शहरी नियोजन, शासकीय मंजुरी, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले सर्व विकास प्रकल्प अधिक अचूक आणि प्रभावीपणे राबवता येतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *