महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ

Summary

मुंबई, दि. २८ : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवीन वाहन खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ […]

मुंबई, दि. २८ : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत नवीन वाहन खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १ लाख २५ हजार ३९९ नवीन वाहनांची नोंदणी झाली असून, हे मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या १,००,९१२ वाहनांच्या नोंदणीपेक्षा तब्बल २४ टक्क्यांनी अधिक आहे, असे परिवहन विभागाचे सह परिवहन आयुक्त (संगणक ) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

वाहन नोंदणीचा तपशील पुढीलप्रमाणे:

दुचाकी वाहने: मागील वर्षी ६६,५८८, यावर्षी ७७,०६१

मोटारकार: मागील वर्षी २१,६२०, यावर्षी ३२,९१२

इतर वाहने (ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक इ.): मागील वर्षी १२,७०४, यावर्षी १५,४२६

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *