भंडारा जिल्ह्यात पोलिसांची सक्रिय कारवाई — रेती चोरीपासून मृत्यूंच्या तपासापर्यंत चौकशी सुरू
दि. 25 ऑक्टोबर 2025
🚨 रेती चोरी प्रकरण
पवनी पोलिसांची कारवाई — अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पवनी तालुक्यातील कुर्झा गावात महसूल विभाग आणि पवनी पोलीस यांच्याकडून संयुक्त पथकाने केलेल्या गस्ती दरम्यान अवैध रेती वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला.
दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सुमारे 12:35 वा. मौजा कुर्झा परिसरात एक ट्रॅक्टर रेती घेऊन येताना दिसला. त्याला थांबवून तपासणी केली असता, ट्रॉलीमध्ये सुमारे 1 ब्रास रेती आढळली. रेती वाहतुकीसाठी आवश्यक पास परवाना विचारला असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले.
यावरून ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 379(2) सह कलम 50(177) मोटार वाहन कायदा, तसेच महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(8) नुसार गुन्हा क्रमांक 374/2025 दाखल करण्यात आला आहे.
मुद्देमाल:
लाल रंगाचा महिंद्रा 415 ट्रॅक्टर (क्र. MH 36 R 2431) किंमत ₹5,00,000,
विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली किंमत ₹1,00,000
आणि 1 ब्रास रेती किंमत ₹6,000,
असा एकूण ₹6,06,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.ह.वा. वकेकार (नं. 1237), पोलीस स्टेशन पवनी हे करीत आहेत.
—
⚰️ मर्ग नोंद – मोहाडी पोलीस स्टेशन
दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 12:00 ते 1:00 वा. दरम्यान दहेगाव येथे दुर्दैवी घटना घडली.
मृतक गणेश लटारूजी ताल्हे (वय 56) हे मागील 15 दिवसांपासून साई हॉस्पिटल, भंडारा येथे उपचार घेत होते. मंडई निमित्ताने गावी मुक्कामास असताना ते घरातून बेपत्ता झाले. शोध घेतल्यावर चुलत सासऱ्यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
यावरून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ह.वा. सुधेश लांजेवार (नं. 725), पोलीस स्टेशन मोहाडी हे करीत आहेत.
📞 मो.क्र. 8275290965
—
⚰️ मर्ग नोंद – तुमसर पोलीस स्टेशन
दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:15 ते 8:45 वा. दरम्यान
रविंद्र गरीबा वाघमारे (वय 60, रा. हसारा टोली) या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
मृतक दारूचे व्यसन आणि मेंदू लकवा या आजाराने त्रस्त होता. आजाराला कंटाळून त्याने राहत्या घरातील छताच्या लाकडी मयालीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात मर्ग क्र. 34/2025 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली असून तपास मपोशि अर्चना जाधव (नं. 703) या करत आहेत.
📞 मो.क्र. 7028243017
—
⚰️ मर्ग नोंद – गोबरवाही पोलीस स्टेशन
दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:30 वा. दरम्यान
सौ. गीता सुनिल गजाम (वय 46, रा. चिखली, ता. तुमसर) यांचा मृतदेह विहिरीत सापडला.
त्या गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. घरातील मंडळींनी शोध घेतल्यानंतर, धान कापणीसाठी शेतात गेलेल्या अवस्थेत त्यांचे प्रेत लसुंते यांच्या शेतातील विहिरीत आढळले.
यावरून मा. ठाणेदारांच्या आदेशानुसार मर्ग नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ह.वा. मंगेश गेडाम (ब.न. 882), पो.स्टे. गोबरवाही हे करीत आहेत.
📞 मो.क्र. 8830935958
—
📰 संपादकीय टीप:
भंडारा जिल्हा पोलीस दलाने अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी केलेली कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी चालवलेले तपास कार्य हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. सर्व नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
—
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलिस योद्धा न्यूज एडिटर
