भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुखापत व आत्महत्येच्या घटना
भंडारा, दि. 23 ऑक्टोबर 2025 (पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क)
भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दुखापत आणि आत्महत्येच्या एकूण पाच घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे व मर्ग नोंदविण्यात आले असून, संबंधित ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
—
1. मित्रासोबत भेटीला गेलेल्या युवकावर चाकूने हल्ला
पो.स्टे. भंडारा:
अशरफी नगर, तकिया वार्ड भंडारा येथील फराज फिरोज शेख (वय 19) हा आपल्या मित्राला भेटण्यासाठी मिस्कीन टँक गार्डन जवळील फुलांच्या दुकानात गेला असता, साद उर्फ बबलू जामा (वय 23, रा. वैभवलक्ष्मी नगर, भोजापूर) व अयान अली (वय 22, रा. भंडारा) या दोघांनी त्याच्याशी वाद घालत चाकूने मनगटावर वार करून जखमी केले. आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अप.क्र.1444/2025, कलम 118(1), 296, 352, 3(5) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.हवा. तुमाने (ब.न. 965) करीत आहेत.
—
2. बार मॅनेजरवर ग्लास फेकून हल्ला
पो.स्टे. भंडारा:
गांधी चौकातील आनंद बार येथे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या अक्षय चंद्रमनी फुलेकर (वय 26, रा. गणेशपुर) यांच्यावर माजी वेटर आकाश खरोले (वय 30) आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केला. आरोपींनी दारू मागितल्यावर मॅनेजरने पैसे मागितल्यामुळे संतापून दोघांनीही काचेच्या ग्लासने त्याच्या डोक्यावर वार केला आणि धमक्या दिल्या.
या घटनेवरून अप.क्र.1445/2025, कलम 118(1), 351(2), 352, 3(5) भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पो.हवा. तुमाने (ब.न.965) करत आहेत.
—
3. मोबाईलच्या कारणावरून मारहाण
पो.स्टे. अडयाळ:
टेकेपार येथील शालीक सुरेश शिडाम (वय 46) यांच्यावर गावातील राधेश्याम व गणेश सयाम या दोघांनी मोबाईलच्या कारणावरून भांडण करून मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीस गोट्याने जखमी केले व धमक्या दिल्या.
या प्रकरणी अप.क्र.315/2025, कलम 118(1), 352, 351(2), 3, 5 भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पो.हवा. बाभरे (ब.न.1052) करीत आहेत.
—
4. १८ वर्षीय मुलीचा अकस्मात मृत्यू
पो.स्टे. भंडारा:
लाखनी येथील पुनम पृश्वीराज वैद्य (वय 18) हिला अकस्मात विभाग स.रू. भंडारा येथे आणल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मर्ग क्र.00/2025, कलम 194 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अन्वये मर्ग नोंदविण्यात आला असून, तपास स.फौ. शेंडे (ब.न.236) करीत आहेत.
—
5. पतीने आत्महत्या केली
पो.स्टे. गोबरवाही:
गारकाभोंगा येथील लक्ष्मीकांत सिरसाम (वय 40) याने कौटुंबिक वादानंतर घरासमोरील सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने पत्नी बबिता यांच्याशी वाद घातल्यानंतर रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली.
या प्रकरणी मर्ग क्र.32/2025, कलम 194 भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 अन्वये मर्ग नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पो.हवा. गणेश बांते (ब.न.1175) करीत आहेत.
—
भंडारा जिल्हा पोलिसांनी सर्व घटनांवरील तपास सुरू केला असून, संबंधित आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
