BREAKING NEWS:
हेडलाइन

बहुजन पॉवर कर्मचारी संघटना रजि. न. २०५४ दिनांक ९/ १०/११ ऑक्टो चे पुकारलेल्या संपात सहभागी नाही. सहभागी नाही- नाही

Summary

बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या सर्व केंद्रीय, परिमंडळ, सर्कल, विभागीय, उपविभागीय, कक्ष पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कामगार, कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ चे आझाद मैदान येथील आंदोलना दरम्यान महावितरण कं व्यवस्थापनाने संघर्ष मंच आणि त्यातील सहभागी संघटनाना […]

बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेच्या
सर्व केंद्रीय, परिमंडळ, सर्कल, विभागीय, उपविभागीय, कक्ष पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कामगार, कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ चे आझाद मैदान येथील आंदोलना दरम्यान महावितरण कं व्यवस्थापनाने संघर्ष मंच आणि त्यातील सहभागी संघटनाना लिखित स्वरूपात आश्वासित केले आहे की महावितरण कं पुनर्रचने ( restructuring ) संबंधाने संघर्ष मंच ने सुचवलेल्या सुचनांचा आदर राखला जाईल प्रत्येक १५ दिवसांनी त्यावर चर्चा केली जाईल आणि सुचनांचा अंतर्भाव करून अंतिम M. P. R.पारित केला जाईल.
शिवाय इतर समस्या सोडविण्या बाबत स्वतंत्र बैठक लवकरच आयोजित केली जाईल त्या मुळे संघर्ष मंच आणि सहभागी बहुजन पॉवर ची आंदोलनाची दिशा तूर्त स्थागित केली असली तरी
इतर संघटनेचे माध्यमातून होणाऱ्या दिनांक ९/१०/११ ऑक्टोबर २०२५. रोजी होणाऱ्या संपात बहुजन पॉवर प्रत्यक्ष् – अप्रत्यक्ष रित्या सहभागी नाही – नाही – आणि नाही.
सर्व कर्मचारी वर्गाने आप आपल्या कामाचे ठिकाणी उपस्तिथ राहून आपले कर्तव्य करावे हे जाहिर आवाहन
कळावे
आपले नम्र
ऍड. राजन शिंदे- सरचिटणीस
श्री. तुषार जाधव- कार्याध्यक्ष
बहुजन पॉवर कर्मचारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *