स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सरस्वती विद्यालयाचे सुयश
Summary
अर्जुनी/मोर:- स्थानिक नगरपंचायत अर्जुनी/मो. जिल्हा गोंदिया येथे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा 2025 अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यात रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा,उत्कृष्ट गणेश मंडळ, उत्कृष्ट घरचे गणपती,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात […]
अर्जुनी/मोर:- स्थानिक नगरपंचायत अर्जुनी/मो. जिल्हा गोंदिया येथे ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा 2025 अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यात रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा,उत्कृष्ट गणेश मंडळ, उत्कृष्ट घरचे गणपती,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.त्यात स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने ‘स्वच्छ शाळा’ या स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त केले तर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु या स्पर्धेत अस्मिता हातझाडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर अक्षरा झोडे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने प्राचार्य जे.डी.पठाण,उपप्राचार्या अर्चना गुरुनुले,पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते, प्रा.टोपेश बिसेन,वरिष्ठ शिक्षक कुंडलिक लोथे यांनी अभिनंदन केले.
