जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सरस्वती विद्यालय अव्वल
अर्जुनी मोरः- प्रादेशिक विद्या प्रधिकरण नागपुर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ स्पर्धा ही श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय पुनाटोली गोंदिया येथे दिनांक २४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.सदर स्पर्धेत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १६ विद्यार्थोंनी सहभाग घेतला. ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ हा या स्पर्धेचा विषय होता. यात अर्जुनी/मोरगाव येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वेंजल तारेश डोंगरे हिने आपल्या प्रभावी मांडणीने परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक मिळवत विभागस्तरीय फेरीत प्रवेश केला. या यशाबद्दल विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षक अमर वसाके यांचे संस्थेच्या वतीने शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्या अर्चना गुरनुले, पर्यवेक्षक शिवचरण रार्घोते व सर्व शिक्षकवृंदांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व नागपूर येथे होणाऱ्या विभागास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
