चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वाढत्या चोऱ्या; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
Summary
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचे पाइपलाइन, लोखंडी साहित्य आणि इतर महत्वाचे साहित्य चोरीस गेल्याचे वृत्त असून या घटनांमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक सूत्रांच्या […]
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचे पाइपलाइन, लोखंडी साहित्य आणि इतर महत्वाचे साहित्य चोरीस गेल्याचे वृत्त असून या घटनांमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या चोऱ्या केवळ सुरक्षेतील त्रुटीमुळे होत नसून, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिलाईमुळे किंवा त्यांच्याच संगनमताने या घटना घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगितले जात असून, यामागील टोळक्यांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
या घटनांमुळे कामगार व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या थर्मल पॉवर प्रोजेक्टमध्ये अशा प्रकारच्या सुरक्षा त्रुटी गंभीर धोक्याचे चिन्ह असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासन आणि सरकारने त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
—
