वरठी येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्म शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला.
Summary
वरठी (प्रतिनिधी): बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 100 व्या जयंती निमित्त वरठी गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे :- श्री.सरपंच चांगदेवजी रघुते सरपंच ग्रा.पं. वरठी तसेच मा.सभापती […]
वरठी (प्रतिनिधी):
बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 100 व्या जयंती निमित्त वरठी गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे :- श्री.सरपंच चांगदेवजी रघुते सरपंच ग्रा.पं. वरठी तसेच मा.सभापती रितेशजी वासनिक पं.स.मोहाड़ी, विश्वजीतजी उके ग्रामविकास अधिकारी, अरविंद मेश्राम माजी पोलीस शिपाई, पुष्पाबाई भुरे माजी पंचायत समिती सदस्य, मनोज सुखानी, रूपाली वासनिक ग्रामपंचायत सदस्य, सुनिलजी बन्सोड माजी ग्रा.प. सदस्य, सदींप बोदंरे ग्रामपंचायत सदस्य, वरठी, राजकुमार वासनिक, राजु सिंह, नजमा पठान, अनिल तुमळाम, रंजीत लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. गावातील महिला-पुरुष, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे समिती तर्फे करण्यात आले. समितीचे सचिव मनिष बन्सोड आणि सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवा आणि ऐक्य यांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.












—
