BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

“फळगळतीचे तातडीने पंचनामे – शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न!”

Summary

काटोल/प्रतिनिधी:- संत्रा व मोसंबी फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांचे निर्देश काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सततच्या अनियमित व अति पावसामुळे संत्रा व मोसंबी या प्रमुख फळपिकांमध्ये मोठ्या […]

काटोल/प्रतिनिधी:-
संत्रा व मोसंबी फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांचे निर्देश
काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सततच्या अनियमित व अति पावसामुळे संत्रा व मोसंबी या प्रमुख फळपिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळती होऊन गंभीर आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काटोल-नरखेडचे आमदार मा. चरणसिंग ठाकुर यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाचे मा. मंत्री मकरंद जाधव पाटील यांची भेट घेतली.
या बैठकीत आमदार ठाकुर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करताना त्यांचे दुःख मंत्री महोदयांपुढे मांडले. त्यांनी सांगितले की, संत्रा आणि मोसंबी हे या परिसरातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असून, फळगळतीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक दिलासा द्यावा.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत मा. मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव पाटील यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात विलंब न करता, यथाशीघ्र अहवाल शासनास सादर करावा, जेणेकरून नुकसानभरपाईचे वितरण शक्य तितक्या लवकर करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असा पुनरुच्चार आमदार चरणसिंग ठाकुर यांनी यावेळी केला. तसेच, जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये पाहणी करून संपूर्ण नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

चौकट :
आमदार चरणसिंग ठाकुर यांची भूमिका

काटोल-नरखेड परिसरातील शेतकऱ्यांचे संत्रा व मोसंबी फळपिकांमधील फळगळतीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत दिली पाहिजे.
मी स्वतः मंत्रालयात जाऊन मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव पाटील यांची भेट घेतली असून, त्यांनी त्वरित पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नुकसानग्रस्तांना योग्य न्याय द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *