मुंबई शहर जिल्ह्यात ‘फिरते सेतू केंद्रा’चे उद्घाटन
मुंबई, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या सेवा पंधरवडा कालावधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून मुंबई शहरात फिरते सेतू केंद्र सुरु करण्यात आले. याद्वारे नागरिकांना विविध दाखले विनाविलंब मिळणार आहे.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने महाऑनलाईन संकेतस्थळावरुन, सेतू सुविधा केंद्र व आपले सेवा केंद्राच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांना, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी इ. आवश्यक असणारे विविध प्रमाणपत्रे आधारविषयक सेवा तात्काळ मिळण्याकरिता मुंबई शहरात वॉर्डनिहाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या फिरत्या सेतू केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
0000
