दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी
Summary
राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे […]
राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
प्रवीण मेश्राम
उत्तर नागपुर प्रतिनिधी
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क