मेजर ध्यानचंद जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

चामोर्शी तालुक्यातील –
आष्टी, दि. 29 ऑगस्ट 2025 – महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पांडे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेमुळे मिळणारे शिस्तबद्ध जीवन, आत्मविश्वास आणि आरोग्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे डॉ. मुसने यांनी जीवनातील खेळाचे महत्व अधोरेखित करताना, “क्रीडेमुळे व्यक्तिमत्त्व घडते आणि सामाजिक ऐक्याला बळ मिळते,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर डॉ. कोरडे यांनी केले. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या अद्वितीय कारकिर्दीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. या कार्यक्रमाला डॉ. शास्त्रकार, डॉ. खूने, प्रा. बोभाटे आणि प्रा. गभणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. रवी गजभिये यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिले.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
गजानन पुराम
मो. 7057785181