सरस्वती विद्यालयाचे कला उत्सवात उंच भरारी
Summary
अर्जुनी/मोर: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेत कला उत्सवामध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. दिनांक 25 ऑगस्टला शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कला उत्सव कार्यक्रम पंचायत समिती अर्जुनी/मोर येथे घेण्यात […]
अर्जुनी/मोर: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेत कला उत्सवामध्ये नेत्रदीपक यश संपादन केले.
दिनांक 25 ऑगस्टला शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कला उत्सव कार्यक्रम पंचायत समिती अर्जुनी/मोर येथे घेण्यात आली.या स्पर्धेत सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले.ही स्पर्धा 9 ते 12 या वर्गासाठी होती. कला उत्सवात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.विविध स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यात कु. वैदेही दिवाकर झोडे शास्त्रीय गीतगायन,(वर्ग 10 ),पराग राजेश चिचमलकर (वर्ग 9) पारंपारिक गीतगायन,कु. किंजल प्रवीण दुधे(वर्ग 10)शास्त्रीय नृत्य,प्रिन्स मिलिंद डोंगरे (वर्ग 10) कथाकथन, व कु. अक्षरा ज्ञानेश्वर झोडे (वर्ग 11)चित्रकला, या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य पठाण सर ,उपप्राचार्य गुरनुले मॅडम, पर्यवेक्षक राघोर्ते सर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व जिल्हास्तरीय कला उत्सवा साठी शुभेच्छा दिल्यात.
