क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा : किरकोळ वादातून तलवारीने जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, आरोपी फरार

Summary

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पाहुणी येथील हनुमान वॉर्डमध्ये किरकोळ वादातून तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पहिली […]

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पाहुणी येथील हनुमान वॉर्डमध्ये किरकोळ वादातून तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिली घटना – २२ ऑगस्ट २०२५

फिर्यादी राधेश्याम अमरकंठ मिरासे (४२) हे २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एकराम मिरासे यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी संदीप सिंग (४०) याने “तू माझ्या घराकडून का आलास” असे म्हणत राधेश्याम यांना थापडबुकीने मारहाण केली. मात्र, त्या वेळी किरकोळ इजा झाल्याने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

दुसरी घटना – २३ ऑगस्ट २०२५

पुढच्या दिवशी सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान, फिर्यादी राधेश्याम मिरासे हे त्यांचे भाऊ राजू गोपीचंद मिरासे (५५) यांच्यासोबत एकराम मिरासे यांच्या घराजवळ बसले असताना आरोपी संदीप सिंग पुन्हा तेथे आला आणि “तुम्ही काय बोलत आहात” असा जाब विचारला. काही वेळाने आरोपी रंजीत सेलोकर (४०) हाही तिथे आला आणि संदीपला “साल्यांना जिवाने मार, जमानत मी घेईन” असे भडकावून तेथून निघून गेला.

थोड्याच वेळात आरोपी संदीप सिंग हा हातात मोठी लोखंडी तलवार घेऊन परत आला आणि फिर्यादी व त्यांचा भाऊ यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात राजू मिरासे यांनी वार चुकविण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या हातावर गंभीर दुखापत झाली. राधेश्याम मिरासे यांनी भाऊ वाचवण्यासाठी हस्तक्षेप केल्यावर आरोपीने त्यांच्यावरही हल्ला केला आणि त्यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या.

स्थानिकांचा हस्तक्षेप

गोंधळाच्या आवाजाने परिसरात गर्दी झाली, त्यानंतर आरोपी तलवार घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

गुन्हा दाखल व तपास

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्र. 283/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 109, 296, 351(3), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

सलग दोन दिवसांतील या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *