✦ देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हिलेज : नागपूरच्या सतनवरी गावाचा इतिहासात समावेश ✦ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन ✦ राज्यात ३५०० स्मार्ट डिजिटल व्हिलेज उभारण्याचा संकल्प महाराष्ट्राचे विकासाचा नवा अध्याय
Summary
कोंढाळी /बाजारगाव दुर्गा प्रसाद पांडे दि. २४ ऑगस्ट ग्रामीण भारताच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दिशेने महाराष्ट्राने आज ऐतिहासिक पाऊल टाकले. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील छोटेसे सतनवरी गाव हे देशातील पहिले “स्मार्ट डिजिटल व्हिलेज” म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. रविवारी […]
कोंढाळी /बाजारगाव दुर्गा प्रसाद पांडे दि. २४ ऑगस्ट
ग्रामीण भारताच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या दिशेने महाराष्ट्राने आज ऐतिहासिक पाऊल टाकले. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील छोटेसे सतनवरी गाव हे देशातील पहिले “स्मार्ट डिजिटल व्हिलेज” म्हणून इतिहासात नोंदले गेले आहे. रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
या सोहळ्यास राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, विभागीय जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अनिल मस्के ,बापूसाहेब रोहम,तसेच व्हॉइस ऑफ इंडिया कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेसचे महाव्यवस्थापक राजेशकुमार भटनागर प्रमुख उपस्थित होते. गावातील सरपंच वैशाली चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो ग्रामस्थांच्या उत्साही सहभागामुळे हा उद्घाटन सोहळा खऱ्या अर्थाने सणासारखा पार पडला.
स्मार्ट डिजिटल व्हिलेज च्या संकल्पने बाबद
सांगितले जाते की
राज्य सरकार व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून उभारलेल्या या पायलट प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण जीवनाला तंत्रज्ञानाशी जोडणे हा आहे. सतनवरी गावात विविध क्षेत्रांत आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे.
कृषी क्षेत्रात : माती परीक्षणासाठी आयटी साधने, ड्रोनद्वारे पिकांची निगराणी, हवामानाचा अंदाज व बाजारभावाची रिअल-टाईम माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार आहे.
शिक्षणात : डिजिटल पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम स्मार्ट क्लासरूम, ऑनलाइन शिक्षण व स्मार्ट अंगणवाडी यामुळे ग्रामीण मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार.
आरोग्यात : प्रत्येक ग्रामस्थासाठी ई-हेल्थ कार्ड, मोबाइल क्लिनिक, टेलीमेडिसिन सेवा व आरोग्य माहितीची डिजिटल नोंदणी.
शासन व प्रशासनात : वाय-फाय सक्षम ग्रामपंचायत, ऑनलाईन अर्ज-सेवा, डिजिटल रेशन कार्ड व पारदर्शकता आणण्यासाठी डेटा डॅशबोर्ड.
हाय-स्पीड फायबर ऑप्टिकल नेटवर्कमुळे स्मार्ट सिंचन, माती सेन्सर, पाणी गुणवत्तेची तपासणी व ग्राम पातळीवर हवामान अंदाज देणे शक्य झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की
“सतनवरीने संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला ग्रामीण भागाशी जोडण्याचे हे पहिले पाऊल आहे. हा प्रयोग केवळ डिजिटल गाव उभारणी नसून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे.
आता गावातला शेतकरी थेट मोबाईलवर बाजारभाव पाहून निर्णय घेऊ शकेल, मुलांना गावातूनच जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि आरोग्यसेवा घराजवळ उपलब्ध होईल.
२०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात ग्रामीण विकास हीच खरी किल्ली आहे. म्हणूनच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील १० गावे – असे मिळून ३५०० स्मार्ट डिजिटल व्हिलेज उभारले जातील. नागपूर जिल्ह्याने या प्रवासाची सुरुवात केली असून, महाराष्ट्राच्या विकासाचा हा नवा अध्याय आहे.”व्हाईस ऑफ इंडिया कॅम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राईजस च्या महासंचालक राजेश भटनागर व त्यांचे चमुंचा सत्कार ही केला गेला.
या प्रसंगी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : “देशातील पहिले स्मार्ट डिजिटल व्हिलेज नागपूर जिल्ह्यात उभारले गेले हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सातनवरी पासून देशातील प्रथम स्मार्ट डिजिटल व्हिलेज ची मुहूर्त मेढ केली या बाबतीत मुख्यमंत्री यांचे आभार मानले.
खासदार श्यामकुमार बर्वे : “आत्मनिर्भर गाव हेच आत्मनिर्भर भारताचे मूळ आहे. सतनवरी हे प्रयोगशील गाव आता देशाला दिशा दाखवणार आहे.”आता या भागात उद्योग सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य करावे अशी मागणी केली.
आमदार चरणसिंह ठाकूर : “गावातूनच भारताची आत्मा जुळलेली आहे. एआय तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण युवकांना नवीन संधी मिळतील.” ए आय टेक्नॉलॉजी मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७चा जागतीक पातळीवर विकसित भारत दिसेल.
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील सातनवरी ची निवड केली या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर : “डिजिटलायझेशनमुळे शासकीय सेवा पारदर्शक व जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचतील. ग्रामीण भागातील बदलाचे हे उत्तम उदाहरण आहे.”
ग्रामस्थांचा उत्साह
सतनवरी गावात या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर उत्सवाचे वातावरण होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत केले, शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. “आजपर्यंत शासनाच्या सेवेसाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागायची, आता मोबाईलवर काम होईल” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय महत्त्व
भारताची ६५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे सतनवरीचे हे मॉडेल केवळ तंत्रज्ञान प्रयोग नाही, तर ग्रामीण सशक्तीकरणाचे, आत्मनिर्भरतेचे आणि समतोल विकासाचे प्रतीक आहे.
हा प्रयोग यशस्वी करना प्रयोग आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील हजारो गावे डिजिटल व्हिलेज म्हणून उभारली जातील.

—
या प्रकारे “स्मार्ट डिजिटल व्हिलेज” हा प्रकल्प केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भारताच्या भवितव्याचे नवे चित्र उभे करतो आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय या भावनेने हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे.
