चन्द्रपुर ब्लॉग महाराष्ट्र हेडलाइन

माझा बाप गांधीला म्हणाला होता – “मला मातृभूमि नाही !”

Summary

किती संयत, तितकंच धारदार उत्तर! सा-या जगातील ज्ञानवंतांशी भेटून आलेला माझा बाप… विश्वाचा थिंक टँक, ज्याच्या वैचारिक आणि वैज्ञानिक उंचीला कोणीही नेता विरोध करू शकत नाही. पण तो मात्र साऱ्यांच्या उणिवांवर बोट ठेवतो, अमूल्याशी, अविचाराशी थेट सामना करतो आणि अन्याय […]

किती संयत, तितकंच धारदार उत्तर!

सा-या जगातील ज्ञानवंतांशी भेटून आलेला माझा बाप…
विश्वाचा थिंक टँक, ज्याच्या वैचारिक आणि वैज्ञानिक उंचीला कोणीही नेता विरोध करू शकत नाही. पण तो मात्र साऱ्यांच्या उणिवांवर बोट ठेवतो, अमूल्याशी, अविचाराशी थेट सामना करतो आणि अन्याय करणाऱ्यांची चीरफाड करतो.

बाबासाहेबांचा संघर्षमय प्रवास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास सहजसोपा नव्हता.
प्रचंड कर्मठ असणाऱ्या तत्कालीन हिंदू मानसिकतेने त्यांना छळले. वर्णव्यवस्थेच्या जहाल यातनांनी त्यांच्या हृदयावर असंख्य डागण्या उमटवल्या. तरीही आपल्या समाजाला शांत करत, मनावर ताबा मिळवत ते निरंतर चेतनेच्या महामार्गावरून बुद्धाच्या प्रवासाला निघाले.

बुद्धाने आम्हाला महादान दिलं – “येणाऱ्या पिढ्या सम्यक मार्गावरून आपलं कल्याण साधतील.”

क्रांतीचे वारे : परिवर्तनाचा महामार्ग

बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली उकीरड्याचा राजवाडा झाला.
भाषा, राहणीमान, शिक्षण यांत प्रचंड परिवर्तन घडून आले. आम्ही प्रजासत्ताक लोकशाही मूल्यांचे संवाहक झालो. जाती-धर्म, भाषा, संस्कृती, प्रांत, लिंग यातील विविधतेतून विधायक सहजीवन फुलवले.

आज काळ बदलला आहे. सहजीवन बदललं, माणसं बदलली. स्वार्थ, अवसरवाद, आक्रमकता आणि कपट वाढलं. पण बुद्धाने प्रतिपादित केलेली चिरंतन मूल्यं सोडणं जगाला शक्य नाही. कारण मूल्यांची अवनती म्हणजे जगाचा विनाश!

आंबेडकरी आंदोलनाचा स्थायीभाव – चेतना

आंबेडकरी आंदोलनात चेतना हा स्थायीभाव आहे.
“मी आंबेडकरी आहे” असं मानणं म्हणजे सम्यक मार्गाचा स्वीकार करणं.
माझ्या जगण्यात अन्यायाला जागा नाही. माझा विरोध सम्यक आहे, माझं वचन सम्यक आहे आणि हिंसेचाही वापर मी केवळ सम्यक कारणासाठीच करतो.

याच संस्कारातून येणाऱ्या पिढ्या हितकारक ठरणार आहेत. कारण आजच्या काळात “आंबेडकरी” नेतृत्वाशिवाय जगाचा पुढचा प्रवास शक्य नाही.

जबाबदारी – पुढच्या पिढ्यांसाठी

जगाची पुनर्रचना करायची असेल, ती लोकचळवळीत रुपांतरित करायची असेल तर आंबेडकरी आंदोलनातील मातृसंघटनांनी, नेतृत्वाने, प्रचारकांनी आणि प्रत्येक सैनिकाने प्रचंड विश्वासाने आंबेडकरी असण्याची शक्तीस्थळे जपली पाहिजेत.

ही शक्तीस्थळे बाबासाहेबांच्या प्रचंड त्याग, समर्पण आणि निष्ठेने आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. त्यांना जपणं, हस्तांतरीत करणं हीच खरी जबाबदारी आहे.

निष्कर्ष

“दरबदर भटके हैं सदियों और खायी ठोकरें…”.
परिवर्तनाची नाव खवळलेल्या समुद्राच्या मध्यभागी हेलकावत असताना त्यातून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर वादळात का सापडलो, याबाबतचा विचारही केवळ सम्यक मार्गानेच सोडवता येईल.

✍️ संकलन : श्री. राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *