BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लोकराज्य विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Summary

मुंबई, दि. १९ – युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या नामांकनात समाविष्ट करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांच्या संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह […]

मुंबई, दि. १९ – युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या नामांकनात समाविष्ट करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गडकिल्ल्यांच्या संदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडआशिष शेलार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, अन्न व औषध प्रशासन मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदींसह मुख्य सचिव राजेश कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळगड, लोहगड, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी या १२ गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामरिक पैलुंबाबत माहिती या अंकात देण्यात आली आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *