BREAKING NEWS:
गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Summary

अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूल व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा ७८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर […]

अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूल व सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा ७८वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी केशरबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्या अर्चना गुरूनुले, पर्यवेक्षक शिवचरण राघो॔ते,जी.एम.बी.ईंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या प्राचार्या शव्या जैन,भगिरथ गांधी, महेश पालीवाल, कल्पना भुते, संस्था पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, माजी शिक्षक उपस्थित होते. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.शाळेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार दिपाली गोल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

संकलन
गणेश सोनपिंपळे
वरिष्ठ पत्रकार
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *