मुंबईत मुसळधार पावसामुळे कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीत सवलतीची मागणी
Summary
मुंबई : १५ ऑगस्टच्या रात्रीपासून १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्यात अडचणी येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, भारतीय हवामान खात्यानेही […]
मुंबई : १५ ऑगस्टच्या रात्रीपासून १६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, भारतीय हवामान खात्यानेही मुंबईसाठी “रेड अलर्ट” जारी केला आहे.
या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली आहे की, पावसामुळे आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे उशिरा पोहोचणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक / फेस रीडिंग हजेरीत सवलत देण्यात यावी.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सफाई कामगार, मोटर लोडर, मालमत्ता, बाजार आदी खात्यांतील कर्मचारी सकाळी ६.३० वाजता कामावर येतात. परंतु, अतिवृष्टीमुळे लोकल व इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांना वेळेत हजेरी लावणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक सवलत द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
ही मागणी बाबा कदम (अध्यक्ष) आणि डॉ. संजय कांबळे-बापेकर (उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
👉 यामुळे मुसळधार पावसातही महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
—
