शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न
गडचिरोली-
विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन सोहळ्यांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती
गडचिरोली, दि. १५ ऑगस्ट २०२५ –
देशभक्तीचा उत्साह आणि अभिमानाची भावना मनात घेऊन आज संपूर्ण देशभर ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गडचिरोली शहरात व परिसरात आयोजित विविध ध्वजारोहण सोहळ्यांना माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान.श्री. डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात डॉ. नेते यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकाविण्यात आला आणि देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला.
यानंतर डॉ. नेते यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय, कॅम्प एरिया येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, गोकुल नगर येथील वीर बाबुराव शेडमाके शहीद स्मारक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिक, कार्यकर्ते व अधिकारी यांच्याशी संवाद साधत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या.
तिरंग्याला सलामी देत क्रांतिकारकांच्या अमर स्मृतींना नमन केले. या स्वातंत्र्य दिना निमित्त आपल्या भावना व्यक्त करताना मा.खा. डॉ. नेते यांनी म्हणाले “राष्ट्रहित सर्वोच्च आहे. आपण सर्वांनी एकजूट, सद्भावना आणि देशसेवा या मूल्यांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवावे,”
असे आवाहन केले.
गडचिरोलीतील या देशभक्तीपूर्ण सोहळ्यांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक, समाजसेवक, अधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण परिसर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी दुमदुमून गेला.


पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181
