गडचिरोली जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन शंभर टक्के यशस्वी.
Summary
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केलेला 11 डिसेंबर 2020 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या आवाहनानुसार गडचिरोली जिल्हा संस्था संचालक संघाच्यावतीने आज 18 डिसेंबर […]
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित केलेला 11 डिसेंबर 2020 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या आवाहनानुसार गडचिरोली जिल्हा संस्था संचालक संघाच्यावतीने आज 18 डिसेंबर 2020 रोज गुरुवारला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले. वरील आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांनी १०० टक्के शाळा बंद ठेऊन हे आंदोलन यशस्वी केले. शासनाने सदर शासन निर्णय तात्काळ रद्द न केल्यास, ४ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाला दिला आहे.
हा बंद १०० टक्के
यशस्वी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा संस्था संचालक संघाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री सचिव जयंत एलमुले, गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनिष शेट्टे, सचिव श्रीपाद वठे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सचिव अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीचे अध्यक्ष संतोष सुरावार सचिव गोपाल मुनघाटे, विजुक्ता गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष भाऊराव गोरे सचिव विजय कुत्तरमारे, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, गडचिरोली जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश चडगुलवार सचिव संजय मल्लेलवार, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओम प्रकाश संग्रामे, शिक्षक भारती गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष सतीश पवार, शिक्षक सेना संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर बगमारे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
सदर मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेमार्फत पाठवण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे सचिव टी.के बोरकर , संजय नारलावार , मुकुंद म्हशाखेत्री, एस. एम. पठाण, दिलीप गडपल्लीवार, धर्मेंद्र मुनघाटे, एम. एन. निंबार्ते, एस.टी मामिडवार, एस. एम.खरकाटे , पी.आर. झलके, व्हि. एम. झोळे, एन डब्ल्यू सेलोकर, ए.एम लांडगे, किशोर पाचभाई, संजय खांडरे, मोरेश्वर खूने, दिगंबर कांबळे, संजय दौ रेवार, विवेकानंद हुलके, प्रदीप चुधरी, एम. बी. गोंनाडे, चंद्रशेखर कापकर, उदय धकाते, आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रतिनिधी प्रा. शेषराव येलेकर