सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा येथे पालक- शिक्षक सभेचे आयोजन
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा वर्ग 1 ते 4 च्या पालक- शिक्षक संघ सभेचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती के. एस.भुते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सत्र 2025-26 मधील या पहिल्या पालक- शिक्षक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून ठराव घेण्यात आले.यानंतर सन 2025-26 करिता पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. कार्यकारणीत शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष म्हणून सौ.सपना नंदागवळी यांची निवड करण्यात आली.सचिव म्हणून श्री.एस.एम.उके तर सहसचिव म्हणून श्री.अविनाशजी नाकाडे यांची निवड करण्यात आली.तसेच प्रत्येक वर्गातून एक पालक सदस्य व वर्गाचे वर्गशिक्षक यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यानंतर सन 2025-26 साठी तयार करण्यात आलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमाच्या नियोजनास मंजुरी तसेच परीक्षांचे नियोजन. विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग यांविषयी माहिती देण्यात आली. तसेच शाळा स्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम या विषयी माहिती प्रस्ताविकेतून श्री.डी. व्ही.मेश्राम यांनी सादर केले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री.वाय.एम.रोकडे सर यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
तसेच सभेच्या अध्यक्षा श्रीमती के. एस.भुते मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून पालकांना संबोधित करताना सांगितले की, मुलांचा अभ्यास हा त्यांच्या शारीरिक, शैक्षणिक व बौद्धिक ज्ञानात अधिक भर पाडणारा आहे.त्याची सांभाळ पूर्वक काळजी पालकांनी घरी घ्यायला हवी., आई-वडील पाल्यांचे पहिले गुरू असतात असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांबाबत असलेल्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले.
कु. ए. एम. पुस्तोडे यांनी संचालन करून आभार श्री. पी. डी.सोंदरकर यांनी मानले. सभेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.
