गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांनाच गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रस्ते व इतर बांधकामाचे कामे मिळाले पाहिजे – दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना!… बांधकाम विभागाचे हुकूमशाही सहन करणार नाही -डॉ. प्रणय खुणे

दिनांक 28 जुलै 2025
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार बांधवांनी मोठ्या मेहनतीने बँकातून करोडो रुपयाचे कर्ज घेऊन जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डांबर प्लांट टाकले व मोठा इन्फॉसस्टक्चर तयार करून अनेक वाहने व मोठमोठ्या नवीन मशिनरी खरेदी केले व या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार देत आहे, व सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये विविध कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे,व जिल्ह्यामध्ये उत्तम दर्जाचे रस्ते व इतर बांधकामे अविरत सुरू आहेत,परंतु सध्या गडचिरोली जिल्ह्यात एका कंपनीने नुकताच अनुभव नसतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर यांचा हातातील कामे स्वतः घेऊन कामे सुरू करण्याचा घाट सुरू केला आहे व या कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जिल्ह्यात एका माजी अधीक्षक अभियंता व बांधकाम विभागातील काही कर्मचारी यांना हाताशी घेऊन नियमांना धाब्यावर बसवून , स्थानिक कॉन्ट्रॅक्टर यांचे कामे हिरावून घेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केला आहे व जिल्ह्यात बोगस कामे करण्याचा सदर प्रयत्न खपवून घेणार नाही*
*व गडचिरोली जिल्ह्यात इतर कोणत्याही कंपनीचे बोगस कामे खपवून घेतले जाणार नाही अशी भूमिका दक्षिण गडचिरोली कॉन्ट्रॅक्टर संघटना यांनी घेतली आहे व वेळ पडेल तर सर्व कंत्राटदार संघटनेच्या वतीने लवकरच रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी व उपोषण व चक्का जाम सुद्धा करण्याची भूमिका सर्व कंत्राटदार संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतले आहे यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली दंडकारन्य कॉन्ट्रॅक्टर संघटन यांनी पत्रकार परिषद घेऊन आज प्रामुख्याने सांगितले या बोगस कंपनीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बदनाम करण्याचा कटकारस्थान सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केलेला आहे व सदर बांधकाम विभागाचे हुकूमशाही अन्याय आपण सहन करणार नाही असे प्रतिपादन दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना सल्लागार डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी परिषदेत प्रतिपादन केले गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने सदर व्यथा राज्य शासनाच्या समोर मांडल्या जाणार आहे व जिल्ह्यचे पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, यांच्यासमोर सुद्धा सदर विषय दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटना भेट घेऊन मांडणार आहे व पुढील रणनीती तयार करण्यात येत आहे व बांधकाम विभागाने नुकताच पूर्वणीयोजित टेंडर केलेले एकूण पाच कंत्राट रद्द करावे असे आवाहन दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केले आहे ,यावेळी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार,सचिव अरुण भाऊ मुक्कावार,मार्गदर्शक डॉ, प्रणय भाऊ खुणे, अरविंद भाऊ कात्रटवार,नानाभाऊ नाकाडे सल्लागार नितीन भाऊ वायलालवार सह अध्यक्ष धनंजय पडिशाला सहसचिव राकेश गुब्बावार, प्रवक्ता अश्विन मेड्डीवार, सहसचिव गौतम अधिकारी, राजू मेहता अजय तुम्मावार, सुकलाल सरकार, मंगेश देशमुख,मनोज पवार,रमेश गंपावर अजय गोरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो.7057785181