क्रीड़ा महाराष्ट्र मुंबई विज्ञानं-तंत्रज्ञान हेडलाइन

खेळाडूंना अधिक सुविधा देण्यासाठी निधी व्यवस्थापनात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

Summary

मुंबई, दि. २३ : राज्यातील खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाच्या निधीचे पारदर्शक आणि सुसूत्र व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. क्रीडा विभागातील विविध योजनांसाठीचे अनुदान व […]

मुंबई, दि. २३ : राज्यातील खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाच्या निधीचे पारदर्शक आणि सुसूत्र व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

क्रीडा विभागातील विविध योजनांसाठीचे अनुदान व निधीचा प्रभावी वापर आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी बँकांच्या मदतीने डिजिटल प्रणाली लागू करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसचिव सुनील पांढरेउपसंचालक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीराज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचाव्यात यासाठी निधीचे पारदर्शक आणि नियमबद्ध व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी खासगी बँकांच्या समन्वयाने नियम व कार्यपद्धतीचे पालन करीत योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच क्रीडा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा आणि सुरक्षाविषयक इतर लाभ मिळावेत यासाठी देखील या प्रणालीद्वारे उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *