शिष्यवृत्ती परीक्षेत धनुष आकरे जिल्ह्यातून प्रथम
Summary
अर्जुनी मोर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे पूर्व उच्च प्राथमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ९ फेब्रुवारी २०२५मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये सरस्वती विद्यालयातील वर्ग नववीचा विद्यार्थी धनुष नरेशकुमार आकरे हा ३०० पैकी २३० गुण, टक्केवारी ७६.६६घेऊन जिल्ह्यातून प्रथम […]

अर्जुनी मोर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे पूर्व उच्च प्राथमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ९ फेब्रुवारी २०२५मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये सरस्वती विद्यालयातील वर्ग नववीचा विद्यार्थी धनुष नरेशकुमार आकरे हा
३०० पैकी २३० गुण, टक्केवारी ७६.६६घेऊन जिल्ह्यातून प्रथम येऊन शिष्यवृत्तीधारक ठरलेला आहे.त्याचे संस्थेच्या वतीने प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धनुषने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील तसेच आपल्या गुरुजनांना दिलेले आहे.