गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

जनसुरक्षा विधेयकाची गडचिरोली जिल्हा काँग्रेस ने केली होळी; जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याकरीता राज्यपालांना  जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिले निवेदन

Summary

गडचिरोली :: महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. […]

गडचिरोली ::
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, संवेदनशील आणि मागास जिल्ह्यातील जनतेवर अशा दडपशाही स्वरूपाच्या कायद्याचा विपरित परिणाम होईल. स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य नागरिक यांच्यावर अवाजवी पोलीस नियंत्रण येईल. विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना अन्यायकारक कारवायांचा सामना करावा लागेल. या विधेयकामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली होणार असून, हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. यामुळे महाराष्ट्रात पोलिसी राजवट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४”  तत्काळ रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा विधेयकाची  होळी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे,घनश्याम वाढई, प्रतीक बारसिंगे, पुष्पलताताई कुमरे,  आशाताई मेश्राम, अपर्णाताई खेवले, सुनिताताई रायपुरे, शालिनीताई पेंदाम, कविताताई उराडे, मालताताई पुडो, पौर्णिमाताई भडके, उत्तम ठाकरे, सुभाष कोठारे, सुरेश भांडेकर, योगेंद्र झंजाळ, उमेश आखाडे,जितेंद्र मुनघाटे, मिलिंद बारसागडे, जावेद खान, माजिद सय्यद, निखिल खोब्रागडे, श्रीनिवास ताटपल्लीवार, स्वप्निल बेहरे, सुधीर बांबोळे, गोपाल कविराज, चोकाजी बांबोळे,  नृपेश नांदणकर, रमेश धकाते, प्रफुल अंबोरकर,  जितेंद्र मुप्पीडवार, तोमदेव जुवारे, सुभाष कोठारे, नीलकंठ गेडाम, गोपाल कोमलवार, जोगुजी तुंकलवार, नामदेव वासेकर, लहुजी भांडेकर, नामदेव फावणवाडे, रवींद्र मडावी, रोहिदास अलाम, तुळशीराम बोबाटे, जोगुजी भोयर, रमेश मुनरतीवार, देवराव मोहुर्ले, राजेंद्र कुकडकार, सुभाष धाईत, नामदेव अंडगलवार, जनार्धन तुंकलवार सह शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *