***भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची राजीनाम्याची मागणी जोरावर***
Summary
कोल्हापूर न्युज वार्ता:-भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटके यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी भाजपचे काही नेत्यांनी केली. नुकत्याच झालेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघ निवनुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन दोघांनी राजीनामे द्यावेत […]
कोल्हापूर न्युज वार्ता:-भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटके यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी भाजपचे काही नेत्यांनी केली.
नुकत्याच झालेल्या पदविधर व शिक्षक मतदार संघ निवनुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
सत्येत असतांना चंद्रकांत पाटील यांनी ईतर पक्षांची फोडाफोडी करुन जुन्यांना डावलुनअनेकांना भाजपा मध्ये घेतले,व पदे दिली .
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली होती.त्यातच पदविधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक गांभीर्याने घेतली नसल्याने भाजपा चा पराभव झाला!
त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारुन दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी केली.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगले माजी तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९