रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी जीव धोक्यात…. मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी केली पाहणी… पाच दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Summary
गडचिरोली | दि. ११ जुलै २०२५ सध्या पावसाचे दिवस सुरू असूनही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गापासून ते वैनगंगा, पोहरा नदीवील पुलापर्यंत, तसेच चामोर्शी-घोट-गौरीपूर- श्रीनिवासपूर रस्ता, याशिवाय चामोर्शी ते भेंडाळा-हरणघाट-मूल मार्ग अशा अनेक […]
गडचिरोली | दि. ११ जुलै २०२५
सध्या पावसाचे दिवस सुरू असूनही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गापासून ते वैनगंगा, पोहरा नदीवील पुलापर्यंत, तसेच चामोर्शी-घोट-गौरीपूर- श्रीनिवासपूर रस्ता, याशिवाय चामोर्शी ते भेंडाळा-हरणघाट-मूल मार्ग अशा अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
या रस्त्यांवर दोनदा डागडुगी केली असली तरीही ती केवळ तात्पुरती फुगीटपणा दाखवणारी ठरली. यामुळे संतप्त नागरिकांनी वेळोवेळी रोष व्यक्त केला. ही परिस्थिती लक्षात घेता माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी आज प्रत्यक्ष त्या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नागरिकांसोबत रस्त्याने चालत जाऊन त्यांनी नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो हे प्रत्यक्ष अनुभवले. अनेक ठिकाणी खोल खड्डे, पाण्याने भरलेला चिखलयुक्त भाग, आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यांची भयावह अवस्था पाहून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करत ही परिस्थिती दाखवली आणि या रस्त्यासाठी स्थायी उपाययोजना न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.
रुग्णांना धोका — अपघातांची शक्यता!
पावसाच्या दिवसांत खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने हे खड्डे दिसतच नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार, रुग्णवाहिका, आणि शाळा-काँलेजला जाणारी वाहने यांना दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागपूर-चंद्रपूरकडे रुग्ण घेऊन जाणे म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्याचा धोका पत्करणे ठरत आहे.
ठोस उपायांची मागणी — मुरूम,बोल्डर दगड, मजबुतीने खड्डे बुजवा!
या पाहणीदरम्यान मा.खा. डॉ.अशोकजी नेते यांनी संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, यावेळी केवळ डागडुगी न करता खड्डे मजबुत व पूर्णपणे बुजवले जावेत. अन्यथा, पाच दिवसांच्या आत उपाय न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे थेट संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
पाहणीवेळी उपस्थित मान्यवर —
या रस्ते पाहणी दौऱ्यात भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, स्थापत्य सहाय्यक अभियंता चंद्रकांत डवरे, भिकाजी सातपुते, महादेव चलाख, रामचंद्र भांडेकर, विकेश चलाख तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
