महाराष्ट्र वर्धा हेडलाइन

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

Summary

वर्धा – राज्यातील बोगस शिक्षक पदभरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी व विदर्भातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी विदर्भमाध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे / निदर्शने […]

वर्धा – राज्यातील बोगस शिक्षक पदभरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी व विदर्भातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी विदर्भमाध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे.

नागपूर विभागासह राज्यात शिक्षण विभागातील बोगस शिक्षक पदभरती घोटाळा गाजत आहे. ज्ञानदानाचे कार्य करणार्या पवित्र शिक्षण विभागातील या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तेव्हा नागपूर विभागातील बोगस शिक्षक पदभरती घोटाळ्यासह राज्यात शिक्षक पदभरती बंद असताना शिक्षण विभागात झालेल्या शिक्षक पदभरतीची राज्यस्तरावरून एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात यावी व दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच विदर्भातील शिक्षण उपसंचालक (नागपूर

/ अमरावती), शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक / माध्यमिक), लेखाधिकारी, गटशिक्षणाधिकारी ही महत्वाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे वरील सर्व रिक्त पदे पदोन्नती / बदलीने तात्काळ भरण्यात यावी, या प्रमुख दोन मागण्यांसाठी विदर्भमाध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने एक दिवसीय विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन शुक्रवार, दि. 27 जून 2025 रोजी, दुपारी 4.00 ते 5.00 वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक (नागपूर /अमरावती) यांचे कार्यालयासमोर करण्यात येत आहे. नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलन माजी आमदार तथा म.रा.मा.शि. महामंडळ मुंबईचे सरचिटणीस व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलन हे विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्?वात करण्यात

येणार आहे. प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या धरणे / निदर्शने आंदोलनाला विदर्भातील शिक्षक कर्मचारी, समविचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थत राहावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विजय ठोकळ, जयदीप सोनखासकर, विगागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, जिल्हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *